डीजेविना, पारंपरिक भजनाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : अन्वी येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीस भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनकर यांनी भेट दिली.

विशेष म्हणजे, कोणताही डीजे न लावता पारंपरिक भजनी मंडळाच्या भक्तिमय भजनांच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या साथीने गणरायाची विसर्जन
मिरवणूक उत्साहात पार पडली. भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला. 

यावेळी भजनी मंडळातील सदस्य व गणेशभक्तांनी सादर केलेल्या भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उपस्थित ग्रामस्थ व गणेशभक्तांशी संवाद साधून गणरायाचे दर्शन घेतले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

आपली संस्कृती, आपली परंपरा आणि भक्तीचा वारसा जपत उत्सव साजरा करण्याचा हा सुंदर आदर्श निश्चितच कौतुकास्पद आहे. 

श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख - समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला भगिनीं तसेच गणेश भक्त मंडळी गावकरी उपस्थित होते.